Home > News Update > रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर येथे आंदोलन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर येथे आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये मातंग समाजावर झालेल्या अन्याय विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने संगमनेर येथे आंदोलन करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संगमनेर येथे आंदोलन
X

अहमदनगर // संगमनेर तालुक्यात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई ) गट यांनी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलन केले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये मातंग समाजावर झालेल्या अन्याय विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी किरण रोहम , अमोल रावसाहेब जगताप ,अशोक बनसोडे आदित्य गायकवाड यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील ,माळशिरस , बोरगाव येथे मातंग समाजाची व्यक्तीचे स्मशानभूमीत अंत्यविधी करू दिले नाही म्हणून दोषींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्याखाली फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे संगमनेर तहसीलदार व डीवायएसपी यांना करण्यात आली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे हे निवेदन देण्यात आले.

Updated : 24 Aug 2021 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top