Home > News Update > पुण्यातील अनेक आयटी कंपन्यामध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरूच

पुण्यातील अनेक आयटी कंपन्यामध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरूच

पुण्यातील अनेक आयटी कंपन्यामध्ये वर्क फ्रॉम होम सुरूच
X

कोरोना काळात आयटी सेक्टरमध्ये 'वर्क फ्रॉम होम' ही संस्कृती चांगलीच रुजल्याचे चित्र पुण्यासह इतरही शहरात पाहायला मिळत आहे. आयटी कंपन्यांचे प्रमुख हब बनू पाहत असलेल्या पुणे शहरात बऱ्याचे आयटी कंपन्यांचे अजूनही 'वर्क फ्रॉम होम'च सुरु आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने कार्यालये सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. असे असताना आयटी कंपन्यांनी आपलं 'वर्क फ्रॉम होम' ठेवण्यालाच पसंती दिल्याचे पुण्यात दिसत आहे. अनेक आयटी कंपन्यानी आपली कार्यालये सुरु करण्याचा मुहूर्त नव्या वर्षातच ढकलल्याचे समोर आले आहे.

तर राज्य शासन ऑक्टोबरपासून कोविडच्या निकषांमध्ये आणखी शिथिलता आणण्याच्या तयारीत आहे. असे असले तरी पुणे शहरातील आयटी कंपन्यांनी आपली कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. काही कंपन्यांनी सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविणे सुरू केले असले तरी, बऱ्याच कंपन्या अजूनही कोरोनाच्या धक्क्यातून सावरलेल्या दिसत नाहीत. पुणे शहरात हिंजवडी, खराडी, कल्याणी नगर आणि विमान नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या आहेत. या कंपन्या आता नवीन वर्षातच सुरू होतील असं बोललं जातं आहे. राज्य सरकारने 11 ऑगस्ट रोजी नवीन निर्देश जारी केले. त्यानुसार कंपन्या पूर्णपणे लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास परवानगी देऊ शकतात. मात्र प्रत्येक शिफ्टमध्ये केवळ 25% कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी आहे, ही सूचना अमलात आणत पुण्यातील आयटी कंपन्यांनी अजून सुरुवात केलेली नाही.

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आवश्यक ती सर्व सुविधा पुरवण्यात आली आहे. आमच्या सामग्री, विक्री आणि ऑपरेशन्स टीमने ऑफिसमधून पुन्हा काम सुरू केले आहे व ते सुरूच ठेवतील. कारण कर्मचारी त्याच भौतिक जागेत अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात. असे एका आयटी कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. आयटी प्रमाणेच इतर अनेक औद्योगिक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा घरून काम करण्याच्या सांगत इतरवेळी कार्यालयात बोलविणे सुरू केले आहे.

Updated : 29 Sep 2021 1:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top