Home > Election 2020 > Live: घुसखोरांविरूद्ध "मनसे" चा  महामोर्चा

Live: घुसखोरांविरूद्ध "मनसे" चा  महामोर्चा

Live: घुसखोरांविरूद्ध मनसे चा  महामोर्चा
X

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी 'मोदी-शाहमुक्त आपली भूमिका घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकानंतर जे राज्यता सत्ता स्थापनेवरून एक विचित्र राजकीय नाट्य पाहायला मिळालं. आणि सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळालं. तर राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. यानंतर मनसे काय भूमिका घेनार याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. २३ जानेवारीला मुंबईतील गोरेगावमधिल मेळाव्यात मनसे पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी नवीन भगवा झेंडा त्यांनी हाती घेतला. यामुळे राज ठाकरे यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका स्वीकारली तर मनसे आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात या चर्चेला उधान आलं. आता राज ठाकरेंनी NRC च्या मुद्द्यावर भाजपचं समर्थन करुन आपल्याच लोकसभेत भूमिकेपासून दूर गेले. महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं असून मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे सभा घेनार आहेत.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/187626512479540/?t=10

Updated : 9 Feb 2020 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top