Home > News Update > कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपयांची मदत, मोदी सरकारची नवी योजना

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपयांची मदत, मोदी सरकारची नवी योजना

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना 10 लाख रुपयांची मदत, मोदी सरकारची नवी योजना
X

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना पीएम केयर्स फॉर चिल्ड्रन च्या मदतीने 10 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ज्या मुलांनी आपले आई वडील कोरोनामुळे गमावले. त्या मुलांना 18 वर्षापर्यंत महिन्याला ठरावीक रक्कम दिली जाणार आहे. तसंच मुलं 23 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत.

कोरोनामुळे ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत. अशा मुलांचं शिक्षण देखील मोफत केलं जाणार आहे. या मुलांनी उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचं व्याज पीएम केअर फंडमधून भरलं जाणार आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 18 वर्षापर्यंत या मुलांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य वीमा मिळेल. आणि या विम्याचे पैसे पीएम केयर्स फंडातून भरले जातील.

ही योजना जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेसंदर्भात बोलताना... ही मुलं आपल्या देशाच्या भवितव्याचं प्रतिनिधित्व करतात. आणि आम्ही या मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सर्व काही करु. एक समाज म्हणून हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही या मुलांचा संभाळ करु आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आशा करु. असं म्हटलं आहे.

Updated : 29 May 2021 2:24 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top