Home > News Update > Weather Monsoon Update : पुण्यासह 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather Monsoon Update : पुण्यासह 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather Monsoon Update : पुण्यासह 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
X

Weather Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यासह राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याचं हवामान विभागाने सांगितेले आहे.

पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असण्याचा हवामान विभागाचा इशारा दिला आहे. ठाणे, सातारा सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईमध्ये मात्र आज पावसाचा जोर अतिशय कमी पाहायला मिळेल राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस आज दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे.

Updated : 8 July 2023 2:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top