Home > News Update > ३ जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; पालघरसाठी 'रेड अलर्ट'

३ जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; पालघरसाठी 'रेड अलर्ट'

३ जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; पालघरसाठी रेड अलर्ट
X

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे परिसरात ३ रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. तर पालघरसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात दक्षिण-पूर्व भागात आणि लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पश्चिम किनारपट्टीवर येत्या २४ तासांत वादळी वारे वाहू शकतात. त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातच्या बंदरांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ३ जूनच्या सकाळी हे वारे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकतील.

यावर्षी मान्सून मुंबईत दाखल होण्याची अधिकृत तारीख ११ जून सांगण्यात आली आहे.

Updated : 31 May 2020 12:29 PM GMT
Next Story
Share it
Top