Home > News Update > मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, रायगड आणि रत्नागिरीत रेड अलर्ट

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, रायगड आणि रत्नागिरीत रेड अलर्ट

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, रायगड आणि रत्नागिरीत रेड अलर्ट
X

राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले आहे. येत्या काही दिवासत कोकणात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात 12 त 15 जून दरम्यान अतिवृष्टीचा होऊ शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. तर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिला आहे. त्याचबरोबर किनारी भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 10 ते 15 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान मुंबईतही सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवातत झाली आहे. कमी दृश्यतेमुळे मुंबई विमानतळावर दुपारी अर्धा तास उड्डाणं थांबवण्यात आली होती. पण नंतर वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

Updated : 10 Jun 2021 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top