Home > News Update > टेन्शन वाढले, आता Monkeypox च्या संसर्गाची भीती

टेन्शन वाढले, आता Monkeypox च्या संसर्गाची भीती

टेन्शन वाढले, आता Monkeypox च्या संसर्गाची भीती
X

एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता monkeypox symptoms या नवीन संसर्गजन्य आजाराने जगाचे टेन्शन वाढवले आहे. साधारणत: मध्य आणि पूर्व आफ्रिकेच्या जंगल परिसरात या आजाराचे रुग्ण आढळतात. पण आतापर्यंत हा आजार आफ्रिकेच्या बाहेर गेला नव्हता. पण आता जगभराती जवळपास १२ देशांमध्ये या आजाराचे तब्बल ९२ रुग्ण आढळले आहेत, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या देशांमध्ये ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वीडन, पोर्तुगाल या देशांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या माहितीली दुजोरा दिलेला आहे.

मुंबईत खबरदारीच्या उपाययोजना

दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात अजून या आजाराचे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र मुंबई महापालिकेने याबाबत खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पण खबरदारी म्हणून बाधीत रुग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्याला आयसोलट करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर रुग्णांना ताप, शरीरावर चट्टे आणि त्यानंतर मोठे पुरळ उठतात. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हा आजार झाल्यास २ ते ४ आठवडे त्याची लक्षणं दिसत असतात. यामध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ ते १० टक्क्यांपर्यंत असते.

टेन्शन वाढले, आता Monkeypox च्या संसर्गाची भीती

या आजाराचा संसर्ग प्राण्यांपासून मानवाला आणि मानवापासून मानवाला होऊ शकतो. त्वचेवरील सूक्ष्म भेगा, तोंड, नाक किंवा डोळ्यांच्या माध्यमातूनही संसर्ग होण्याची शक्यता असते.

Updated : 23 May 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top