Home > News Update > अनिल देशमुख यांच्या ED च्या कोठडीत 15 नोव्हेंपर्यंत वाढ, काय घडलं आत्तापर्यंत?

अनिल देशमुख यांच्या ED च्या कोठडीत 15 नोव्हेंपर्यंत वाढ, काय घडलं आत्तापर्यंत?

अनिल देशमुख यांच्या ED च्या कोठडीत 15 नोव्हेंपर्यंत वाढ, काय घडलं आत्तापर्यंत?
X

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई उच्च न्यायालयात हजर केले होते. त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली त्यांना आता 15 नोव्हेंबर पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने त्यांना अटक केली होती. ED ने न्यायालयात अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या ED च्या कोठडीची मुदत 6 नोव्हेबरला संपली होती. त्यामुळं त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात केलं असता त्यांना यावेळी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

त्यांना जामीन मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना अनिल देशमुख यांच्या वकीलाने लगेच जामीन अर्ज दाखल केला, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयाने 12 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. मात्र, ED ने उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यानंतर न्यायालयाने अनिल देशमुख यांना ED ची कोठडी सुनावली होती.

दरम्यान 6 नोव्हेंबरला न्यायालयात ED ने अनिल देशमुख यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी फेटाळून लावत अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ED ची कोठडी सुनावल्यानं त्यांच्या जामीनाचा मार्ग आता कठीण झाल आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती.

या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.

Updated : 12 Nov 2021 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top