Home > News Update > दिल्ली पोलिंसांनीच लीक केली, मोहम्मद जुबैर यांची बेल ऑर्डर, वकिलाचा गंभीर आरोप

दिल्ली पोलिंसांनीच लीक केली, मोहम्मद जुबैर यांची बेल ऑर्डर, वकिलाचा गंभीर आरोप

दिल्ली पोलिंसांनीच लीक केली, मोहम्मद जुबैर यांची बेल ऑर्डर, वकिलाचा गंभीर आरोप
X

दिल्लीच्या पटीयाला न्यायालयाने अल्ट न्यूज चे सहसंपादक मोहम्मद जुबैर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जुबैर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली होती.

त्यांच्याविरोधात कथितपणे धार्मिक भावना भडकावणे आणि धर्मामध्ये वैमनस्य वाढवण्याचा आरोप आहे. त्यामध्ये आता गु्न्हेगारी षड्यंत्र रचणे. यासह पुरावे नष्ट करणे. असे आरोप जोडण्यात आले आहेत. जुबैर यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिल्ली पोलिसांच्या मागणीनुसार १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्या दरम्यान जुबैर यांच्या वकिलांनी दिल्ली पोलिसांनी बेल ऑर्डर लिक केल्याचा आरोप केला आहे.

ED करणार चौकशी…

मिळालेल्या माहितीनुसार ED देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे. विविध माध्यमातून वृत्त संस्थेला विविध देशातून २ कोटी ३१ लाख ९३३ रूपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यामध्ये ED देखील चौकशी करू शकते.

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे जुबैर यांना अटक करण्यात आली आहे. नुपूर शर्मा यांचा खरा चेहरा जुबैर यांनी जगासमोर आणला होता… Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांनी टाइम्स नाऊ च्या कार्यक्रमात भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांचा अपमानास्पद उल्लेख केला होता. त्याचा व्हिडीओ जुबैर यांनी ट्वीट केला होता. त्यानंतर जगभरात भाजप वर टीका करण्यात आली होती. मुस्लीम राष्ट्रांनी भारत सरकारच्या राजदूतांना बोलावून यावर आपत्ती नोंदवली होती. जुबैर यांच्या ट्वीट ने भारत सरकार ला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली होती. भाजपला नुपूर शर्मा यांना प्रवक्ते पदावरून निलंबीत करावे लागले होते.

दरम्यान दिल्ली पोलिसांना एका ट्वीटर हॅडलवरून तक्रार आली होती. या ट्वीटर हॅडलच्या मते जुबैर यांनी केलेल्या एका ट्वीट मुळे एका धर्माच्या देवदेवतांचा अपमान झाला आहे. जुबैर यांनी हे ट्वीट केल्यानंतर सदर ट्वीट वारंवार रिट्वीट करण्यात आलं. हे रिट्वीट करणारी एक टीम आहे. ती शांतता भंग करण्याचं काम करते. असा आरोप या ट्वीटर युजर ने केला आहे. दरम्यान जुबैर यांच्या अटकेनंतर मोदी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला जात आहे.

Updated : 2 July 2022 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top