Home > News Update > पंतप्रधान मोदींच्या 'टीका उत्सव'चा फज्जा, आधीच्या तुलनेत कमी लसीकरण

पंतप्रधान मोदींच्या 'टीका उत्सव'चा फज्जा, आधीच्या तुलनेत कमी लसीकरण

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरली असताना पंतप्रधान मोदींनी कोरोनावरील लसीसाठी 'टीका उत्सव' जाहीर केला. पण चार दिवसांच्या या उत्सवाने काय साधलं हे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान मोदींच्या टीका उत्सवचा फज्जा, आधीच्या तुलनेत कमी लसीकरण
X

नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'लसीकरण उत्सवाची' घोषणा केली. 11 ते 14 एप्रिल दरमन्यान हा कोरोनावरील लसीकरण उत्सव साजरा झाला. पण या काळातील कोवीड लसीकरणाच्या आकडेवारीवरुन इतर वेळेपेक्षा या काळात कमी लसीकरण झाल्याचे उघड झाल्याचे वृत्त द वायरने दिले आहे.

covid19india.org च्या माहितीनुसार या चार दिवसात एकूण 1 कोटी 28 लाख लोकांना लस देण्यात आली. पण याआधी म्हणजेच 7 एप्रिल ते 10 एप्रिल या चार दिवसांच्या काळात 1 कोटी 45 लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार 11 एप्रिलला 29 लाख 33 हजार लोकांना लस देण्यात आली. पण 8 एप्रिल रोजी 41 लाख 40 हजार लोकांना लस देण्यात आली होती. तसेच सात एप्रिलला 31 लाख 20 हजार, 9 एप्रिल रोजी 37 लाख 40 हजार आणि 10 एप्रिल रोजी 35 लाख 20 हजार जणांना लस देण्यात आली.


पण लसीकरण उत्सवा दरम्यान 12 एप्रिल रोजी 40 लाख 4 हजार, पण 13 एप्रिल रोजी ही संख्या 33 टक्क्यांनी घटत केवळ 26 लाख 46 हजारपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली. तर 14 एप्रिल रोजी 22. 13 लाख लोकांना लस देण्यात आली. याचाच अर्थ लसीकरण उत्सवा दरम्यान कमी लसीकरण झाले. आतापर्यंत लसीकरणा दरम्यान 2 एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजेच 42 लाख 70 हजार डोस दिले गेले होते.

एकीकडे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे की देशात 4 कोटी 30 हजार कोरोना लसींचा साठ आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लसींचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे आणि केंद्राने तातडीने लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. याचसोबत ओडिशा, राजस्थान या राज्यांनीही लसींचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे.

Updated : 17 April 2021 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top