Home > Election 2020 > सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल, पाहा काय म्हणाले अजित पवार?

सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल, पाहा काय म्हणाले अजित पवार?

सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज दाखल, पाहा काय म्हणाले अजित पवार?
X

आज पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेमध्ये शरद पवार आणि कुटुंबियांवर टीका केली होती. त्यावरुन आज पुण्यातल्या सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी आत्मपरिक्षण करावे पवार कुटुंबियांची काळजी करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले अजित पवार?

‘’आमच्या पक्षात काय चाललंय त्याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठरवतील, तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्ही समाजाची चिंता केली असती, गरीबांना न्याय देण्याची भुमिका घेतली असती, राफेल विमानाबाबत शंका डोक्यातून काढली असती बरं झालं असत. तुम्ही लोक आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही लावारिस म्हणतात. तुमचे लोक तुम्हाला विष्णूचा अकरावा अवतार म्हणतात, ते हनुमानाची जात काढतात तसेच तुमचे आमदार मुलींना पळवून नेण्याची भाषाही करतात, या गोष्टींच जरा आत्मपरिक्षण करा,’’

अशा शब्दांत अजित पवार यांनी मोदींचा समाचार घेतला.

यावेळी पुण्याचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला. आता दुसरा मोदी पळून जाणार असं म्हणत जोशी यांनी मोदींवर निशाणा साधला. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदींवर देखील निशाणा साधला. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार पार्थ पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Updated : 3 April 2019 8:16 AM GMT
Next Story
Share it
Top