Home > News Update > "मोदींनी पाठवले कनेक्टर नसलेले व्हेंटिलेटर"

"मोदींनी पाठवले कनेक्टर नसलेले व्हेंटिलेटर"

पंतप्रधान सहाय्यता निधीतून 10 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला 60 व्हेंटिलेटर मिळाले होते.

मोदींनी पाठवले कनेक्टर नसलेले व्हेंटिलेटर
X

मुंबई: राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना केंद्र सरकारने राज्यसरकारला मदत म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीकडून व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहे. मात्र या व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याने वापरता येत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की,

"मोदी सरकारने #PMCareFunds मधून 10 दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला 60 व्हेंटिलेटर पाठवले. परंतु ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाहीत. व्हेंटिलेटरची तीव्र निकड असताना असा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

ट्वीट.. https://twitter.com/sachin_inc/status/1390275752642236418?s=19

यावरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधत,मोदी सरकारच्या योजना कौशल्य व व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचा, खोचक टोलाही यावेळी लगावला.

Updated : 6 May 2021 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top