Home > Election 2020 > मोदी सरकार लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत आहे आणि ही लाजिरवाणी बाब आहे." - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

मोदी सरकार लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत आहे आणि ही लाजिरवाणी बाब आहे." - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

मोदी सरकार लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत आहे आणि ही लाजिरवाणी बाब आहे. - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
X

"आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत आहे आणि ही लाजिरवाणी बाब आहे." - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

‘मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे’, असं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. देशात सध्या लोकसभा निवडणूका सुरू असून निवडणुकीमध्य़े सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, जवान, राष्ट्रभक्ती या मुद्द्यावर भाजप प्रचार करत असल्याचं दिसून येतं आहे. यावरच डॉ. मनमोहन सिंह यांनी बोट ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले मनमोहन सिंह?

‘मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे’, ‘युपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइकही झाले होते, पण आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नाही’.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं.

नरेंद्र मोदींनी या संकल्पनेला केला होता विरोध….

’26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली आणि राष्ट्रीय दहशतवादी विरोधी केंद्राची (एनसीटीसी) संकल्पना मांडली. पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यास विरोध केला होता’, असं म्हणत मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

26/11 झाल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला का केला नाही?

मोदी सरकारच्या काळात भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र, 26/11 झाल्यानंतर मनमोहन सिंह सरकारने पाकिस्तानवर हल्ला का केला नाही. असा सवाल भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. याला मनमोहन सिंह यांनी उत्तर दिले.

‘2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतदेखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हतं या आरोपाशी मी सहमत नाही. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. तसंच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणण्याचाही भूमिका आम्ही घेतली होती’, ‘आम्हाला यामध्ये यशही मिळालं होतं. मुंबई हल्ल्यानंतर 14 दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात आलं. युपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून 10 लाख डॉलर्सचं बक्षीसही जाहीर करुन घेतलं. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही यासंबंधी कधी जाहीर केलं नाही’, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं आहे.

Updated : 4 May 2019 4:29 AM GMT
Next Story
Share it
Top