Home > News Update > मोदींचा वाढदिवस काय घडलं दिवसभरात?

मोदींचा वाढदिवस काय घडलं दिवसभरात?

मोदींचा वाढदिवस काय घडलं दिवसभरात? Narendra Modi Birthday What happened today

मोदींचा वाढदिवस काय घडलं दिवसभरात?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी यांची प्रतिमा उजळण्यात लागलेल्या भाजपच्या आयटी सेलला आज वेगळ्याच आव्हानाला सामोरं जावं लागलं आहे. आज ट्विटरवर आज दिवसभर 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस', 'मोदी रोजगार दो' आणि 'जुमला दिवस' यासारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

या हॅशटॅगचा वापर करणाऱ्यांमध्ये बहुतेक तरुणांचा समावेश असून, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही याबद्दल ट्विट केलं आहे.

दरम्यान, तरुणांनी रोजगार मागत, बेरोजगारीच्या रेकॉर्ड बद्दल चर्चा केली. पंतप्रधान मोदींना रोजगार देण्याच्या वचनाची आठवण देखील काही तरुणांनी केली आहे. आज दिवसभर मोदी यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडीओ काढून लोक मोदींना प्रश्न विचारत होते. तर दुसरीकडे, भाजप समर्थकांनी 'हॅपी बर्थडे मोदीजी' ट्रेंड करत पंतप्रधानांच्या कार्याचे कौतुक करत त्यांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, सोशल मीडियावर युवकांच्या मोहिमेपूर्वीच, भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड काळात मलीन झालेली मोदी यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, भाजपने देशातील अनेक वृत्तपत्रात पंतप्रधानांची स्तुती करणारे अनेक लेख छापल्याचं पाहायला मिळालं. काही वर्तमानपत्रांमध्ये मोठ-मोठ्या पानांच्या जाहिराती दिल्या गेल्या आहेत. या जाहिरातींमध्ये पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य, लसीकरण, खेळ, महिला विकास, संस्कृती आणि आर्थिक विकासापर्यंतचे दावे करण्यात आले आहेत. तसेच, भारताला पुन्हा विश्व गुरु बनवण्याच्या प्रयत्नाची चर्चा देखील यामध्ये करण्यात आली आहे.

मात्र, भाजपच्या या इमेज-मेकींग मोहिमेला तरुणांनी ट्विटरवर मोदींना प्रश्न विचारात देशाच्या आर्थिक स्थितीचं चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसरीकडे मोदी यांचा वाढदिवस 'जुमला दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा "युवा हल्ला बोलने" या ट्वीटर अकांउटवरून एक व्हिडिओ शेअर करत केली आहे. ज्यामध्ये मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी रोजगार उपलब्ध करून देण्याबद्दल अनेक भाषणे केली होती.तसेच, पुनीत कुमार सिंह नावाच्या एका यूजरने एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये काही सुशिक्षित तरुण भजी तळतांना दिसत आहेत. ते लिहितात "भारत 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारीला सामोरे जात आहे ...!तर गोविंद मिश्रा नावाच्या एका ट्विटर युजरने काही फोटो शेअर केला आहे.


या सोबतच, पत्रकार किशन गुप्ता नावाच्या एका ट्विटर युजरनेदेखील हे फोटो ट्विट केले आहेत.दरम्यान, काँग्रेस नेते श्रीनिवास बिवी यांनी 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' असं ठळकपणे लिहिलेल्या एका मोठ्या बॅनरचा व्हिडिओ ट्विट करत लिहिलं आहे, "मोदीजी तामिळनाडू युवक काँग्रेस कडून

तुमचे अभिनंदन."यासोबतच, आशुतोष मिश्रा यांनी बेरोजगारीमुळे वाढलेल्या आत्महत्यांबद्दलचा एनसीआरबीचा एक रिपोर्ट ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.प्रदीप पटेल नावाच्या यूजरने लिहिले आहे की, "3 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, परंतु #SSCGD2018 च्या उमेदवारांची नियुक्ती झालेली नाही. पंतप्रधान, मी तुम्हाला विनंती करतो की या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आदेश जारी करा."तर, बिपीन भारती नावाच्या यूजरने डिझेल-पेट्रोल, एलपीजी आणि जीडीपीबद्दल टोमणे मारत ट्विट केलं आहे.युथ कॉंग्रेसने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' म्हणून देशभरात साजरा केला. काँग्रेसने या संदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.

"दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे मोठे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले, परंतु आज केंद्र सरकार रोजगाराच्या मुद्द्यावर पूर्णपणे गप्प आहे."


दरम्यान, युवकांसाठी रोजगाराची मागणी करणाऱ्या "युवा हल्ला बोल" या राष्ट्रीय युवा चळवळीने 17 सप्टेंबर हा दिवस या अगोदरच 'जुमला दिन' घोषित केला होता. तसेच, या अंतर्गत, ते सोशल मीडियावर मोहिमा चालवत आहेत. विविध भागात रॅल्या देखील काढल्या जात आहेत.

Updated : 17 Sep 2021 4:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top