मोदी-शहा खोटं बोलत आहेत – उमर खालिद

Umar khalid

देशभरात NRC आणि CAA कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. देशातील वेगवेगळ्या विद्यापीठात विद्यार्थी मोठ्या संख्येने या कायद्याविरोधात उतरले आहेत. नागरिकत्व कायद्याबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. देशात NRC कायद्याबाबत मोठं वातावरण निर्माण केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कायद्याबाबत खोटं बोलत असल्याचा आरोप JNU नेते उमर खालिद याने केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रॅली आयोजित करण्यात आली होती. नोटबंदीने देशातील लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. छोटे उद्योग धंदे बंद झालेत. याच कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था आज खालावली आहे. असं मत उमर खालिद याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.