Home > News Update > 'टोल मुक्त भारत करू' भाजपच्या आश्वासनांविरोधात मनसेचं आंदोलन

'टोल मुक्त भारत करू' भाजपच्या आश्वासनांविरोधात मनसेचं आंदोलन

टोल मुक्त भारत करू भाजपच्या आश्वासनांविरोधात मनसेचं आंदोलन
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण राज्यात टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने टोल मुक्त करु असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कोणताही टोल नाका बंद करण्यात आलेला नाही. याविरोधात नागपुर येथे मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आहे.

दरम्यान याच अनुषंगाने नागपुरातील अनेक टोल नाक्यावर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नागपुरातील अमरावती रोड वरील गोंडखेरी टोलनाका व सेलू टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी जनतेला आश्वासन दिले होते की, टोल मुक्त भारत करू. पण असं काहीही झालं नसून उलट आता प्रत्येक टोल नाक्यावर सक्ती ने वसुली होत असल्याचा आरोप नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी केला आहे.

Updated : 1 Aug 2023 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top