Home > News Update > मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेच्या जागर पदयात्रेला सुरुवात

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेच्या जागर पदयात्रेला सुरुवात

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेच्या जागर पदयात्रेला सुरुवात
X

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाची सध्या स्थिती ही अत्यंत बिकट आहे. १७ वर्षापासून या महामार्गाचं काम रखडलं आहे. या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होता दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज पहाटेपासून जागर पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मनसेचे युवानेते अमित ठाकरे (Amit tackeray) यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली असून सरकारला जागे करण्यासाठी १६ किलोमीटर पायी पदयात्रा होणार आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी जागर यात्रा सुरू हो0ण्यापूर्वी शिव मंदिराचे दर्शन घेतले आहे.

गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे. झालेलं काम किती निकृष्ठ दर्जाचं होतं, हे दाखवण्यासाठी आज जागर यात्रा काढली आहे. त्यामुळे लोकांना मनसेची ताकद किती आहे हे सुध्दा समजेल असं मनसेच्या एका नेत्याने वक्तव्य केलं आहे. जागर पदयात्रेत मनसेचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Updated : 27 Aug 2023 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top