News Update
Home > News Update > बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवर खड्ड्यांमध्ये फटाके फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन

बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवर खड्ड्यांमध्ये फटाके फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन

बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवर खड्ड्यांमध्ये फटाके फोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन
X

जळगाव : बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठ- मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यांवरील खड्डे बुजले जात नाही किंवा दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे बांधकाम विभागाच्या लक्ष वेधण्यासाठी चोपडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्यांमध्ये फटाके फोडून आंदोलन केलं. दरम्यान तालुका खड्डामुक्त करण्यात यावा अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली.

दहा दिवसात तालुक्याचे रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी राज्य सरकार व बांधकाम विभाग जबाबदार राहतील असे मनसे सांगितले. बांधकाम विभागात अभियंता अधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या खुर्चीला हार घातला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख पुंडलिक महाजन , निलेश बारी, निखिल पाटील, महेंद्र भामरे, विक्की माखिजा, अजय परदेशी, सनी पाटील , दीपक विसावे, मयूर भोई, व्यंकटेश पवार, यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 1 Nov 2021 12:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top