मनसेला पडले मोठे खिंडार पुण्यातील शकडो कार्यकर्ते भाजपात सामील.
X
राज ठाकरे यांचे राजपुत्र पुण्याची जबाबदारी सांभाळत असताना, पुण्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी माणसे कडे पाठ वाळवून भाजपत प्रवेश केल्याचं पुढे येत आहे. मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
पुणे : लोककसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूका तोंडावर असताना मनसेला पडले मोठे खिंडार.सर्वच पक्ष निवडणुकीच्या जय्यत तयारीत दिसत आहेत. पक्षांना निवडणुकीचा फिवर चढालेला दिसतोय. पुणे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवले आहे. म्हणून अमित ठाकरेंचे पुण्यातील दौरे वाढले आहेत. २०२४ होणाऱ्या निवडणुकांमध्ये पुण्यातून मनसेचा पहिला खासदार निवडून आणण्यासाठी अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या बैठका घेत आहेत.
मनसेचे पदाधिकारी मंदार बलकवडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजपचा पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी संवाद कार्यक्रमानंतर बलकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.एकीकडे स्वतः राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यात मनसे वाढीसाठी लक्ष घातलं आहे. कार्यकर्त्यांची आणि पक्षाची बांधणी देखील सुरू केली आहे. मात्र असा असताना देखील आता भाजपने मनसेला मोठा धक्का दिला आहे. स्वतः राज आणि अमित ठाकरे हे पुण्यातील मनसे वाढवत असताना भाजपने मनसेतील एक मोठी फळी भाजपत गेली आहे.
पुण्यात भाजपा विजयी होणार
पुणे लोकसभा मतदारसंघात सुपर व्हॅरियर्स संवाद कार्यक्रमात चंद्रशेखर बावानकुळे यांनी भाजपचाच विजय होईल अशी आशंका व्यक्ती केली आहे. ५१ टक्के मते घेऊन महायुतीचाच उमेदवार जिंकेल. गेल्या वेळेपेक्षाही मोठा विजय पुण्यात होईल, अशी योजना आम्ही तयार केली आहे, असे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात ४५ पेक्षा जास्त लोकसभा व २२५ पेक्षा जास्त विधानसभेत महायुतीचा महाविजय होणार आणी भाजपाचे सुपर वॉरियर्स विजयाचे शिलेदार ठरतील.
संक्रातीपासून महायुतीच्या मेळाव्याचा वाजणार बिगुल.
महायुती बूथस्तरापासून मतदान केंद्रस्तरापर्यंत तालुकास्तरापासून एकत्रित आणि एकजुटीने जनतेपर्यंत जाईल.
संक्रांतीच्या पावनधर्तीवर राज्यात १४ तारखेपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत. हे सर्व जिल्हास्तरीय मेळावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे होतील. मार्च महिन्यात राज्याचा मेळावा होईल. अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.






