Home > News Update > आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी' - राज ठाकरे

आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी' - राज ठाकरे

आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी - राज ठाकरे
X

राज्यात मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण फारच तापलं आहे.त्याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्य़ा आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलयं.याचपार्श्वभूमीवर आता मनसे प्रमुख (Raj Thackrey)राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर पत्राद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत.तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दिली.राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय.

योगी सरकारच्य़ा या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केली आहे.यामध्ये राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थलांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असं म्हटलयं.पुढे बोलताना राज यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी. असं म्हटलं आहे तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो,हिच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असं म्हटलं आहे.

Updated : 28 April 2022 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top