Home > News Update > पाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास तंगड्या काढू, मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा

पाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास तंगड्या काढू, मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा

विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना मोदी स्टेडियमवर होणार असल्याने आक्रमक झालेल्या मनसेने आता पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेमांमध्ये काम देण्यावरून इशारा दिला आहे.

पाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास तंगड्या काढू, मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा
X

ICC World Cup 2023 मधील भारत पाकिस्तान सामना अहमदाबाद येथील मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यावरून मनसे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. पाकिस्तानी खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांनाही आमचा विरोध आहे. त्यामुळे जर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय सिनेमांमध्ये किंवा सीरीजमध्ये काम दिल्यास आम्ही त्यांच्या तंगड्या काढून हातात देऊ. त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित निर्मात्याची असेल, असंही अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

यावेळी अमेय खोपकर यांनी म्हटले की, भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत साफ नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.

हे हि पहा

Updated : 30 Jun 2023 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top