Home > News Update > "श्रेय लाटण्याचे राजकारण महापौरांना लखलाभो" म्हणत मनसेकडून महापौरांना राखी- लाडुची भेट

"श्रेय लाटण्याचे राजकारण महापौरांना लखलाभो" म्हणत मनसेकडून महापौरांना राखी- लाडुची भेट

संपूर्ण एक दिवस हा महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या मनसेच्या मागणीचे श्रेय महापौरांनी घेतल्याचे म्हणत मनसेकडून महापौरांना राखी- लाडुची भेट

श्रेय लाटण्याचे राजकारण महापौरांना लखलाभो म्हणत मनसेकडून महापौरांना राखी- लाडुची भेट
X

ठाणे शहर महिला सेनेच्या वतीने 18 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे ठाणे शहरामध्ये संपूर्ण एक दिवस हा महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता ठाण्यात एक दिवस महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडुन मागणी करण्यात आल्यानेच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे म्हणत महापौरांनी श्रेय लाटल्याने त्यांना राखी- लाडुची भेट देण्यात आली असं मनसे महिला सेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांचा मार्गदर्शनाखाली ठाणे शहर महिला मनसे अध्यक्ष समिषा समीर मार्कंडे व महिला सेनेच्या वतीने ठाणे शहरातील महिलांसाठी संपूर्ण एक दिवस लसीकरण व्हावे यासाठी मनपाला निवेदन देण्यात आले होते.

त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने महापौर यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवडयात एक दिवस महिलांसाठी ठाण्यात लसीकरण मोहिम अशी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे मनसेच्या महिला सेनेच्या निवेदनाचे श्रेय लाटण्याचा उद्योग महापौरांनी केला असं मनसेनं म्हटले आहे. परंतु या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेचेच आहे , "श्रेयाचे राजकारण महापौरांना लखलाभ" असे उदगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना अध्यक्ष समीशा समीर मार्कंड यांनी काढले आहेत. महिलांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे.

असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेना अध्यक्ष समीशा समीर मार्कंड यांनी म्हटले आहे.

Updated : 21 Aug 2021 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top