Home > News Update > #Governorgoback : राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

#Governorgoback : राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

मराठी माणसाला डिवचू नका, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले...

#Governorgoback : राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा
X

भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, तर दुसरीकडे आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना थेट इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, त्यामध्ये त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात काय म्हटले आहे ते पाहूया...

"आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; है । न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो."


Updated : 30 July 2022 6:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top