Home > News Update > "हे उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिर खुले बार" म्हणत मनसेचे आंदोलन

"हे उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिर खुले बार" म्हणत मनसेचे आंदोलन

हे उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिर खुले बार म्हणत मनसेचे आंदोलन
X

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यातील देखील मंदिर बंद आहे, मात्र आता मंदिरांचा प्रश्न चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिराबाहेर मनसेतर्फे मंदिर उघडा आंदोलन करण्यात आले आहे.

"हे उद्धवा अजब तुझे सरकार, बंद मंदिर खुले बार" असं म्हणत मनसेच्या वतीने धुळे शहरातील एकविरा देवीच्या मंदिराबाहेर राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले आहे.

राज्यात सर्व हॉटेल, बार, दारूची दुकानं उघडी करण्यात आली असून फक्त हिंदू मंदिरांवरच कोरोनाचे संकट घोंगावत आहे का..? असा संतप्त सवाल विचारत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला मंदिर खुली करण्यासंदर्भात आंदोलन करून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 8 Sep 2021 7:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top