Home > News Update > MLC polls: अखेर निवडणूक बिनविरोध! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर...

MLC polls: अखेर निवडणूक बिनविरोध! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर...

MLC polls: अखेर निवडणूक बिनविरोध! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर...
X

मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागेसाठी होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होणार आहे. 9 जागेसाठी दाखल झालेल्या 14 अर्जापैकी 1 अर्ज बाद तर भाजपच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केल्यानं विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहे.

उमेदवारी जाहीर करताना धक्का देणाऱ्या भाजपने अर्ज मागे घेतानाही भाजप घोषित उमेदवार डॉ अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि त्यांच्या जागेवर रमेश कराड या राखीव उमेदवाराचा अर्ज पक्षांकडून कायम करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अधिकृत 5 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे 2 डमी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर भाजप कडून चार अधिकृत तर दोन डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून डमी अर्ज भरलेले किरण पावस्कर व शिवाजी गर्जे यांनी उमेदवारी मागे घेतली.

शाहबाज राठोड या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला खरा. मात्र त्याचा अर्ज आमदारांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या नसल्यानं बाद करण्यात आला आहे.

शेवटच्या क्षणी राजकीय नाट्य!

दिल्लीतून भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये चार उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. मात्र, ऐनवेळेला अजित गोपछडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि त्यामुळं राखीव उमेदवार रमेश कराड यांचा अर्ज कायम करण्यात आला आहे.

सोबतच संदीप लेले यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध झालेले विधान परिषद आमदार

- शिवसेना-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नीलम गोऱ्हे

- भाजप-

प्रवीण दटके,

रमेश कराड,

गोपीचंद पडवळकर,

रणजीतसिंह मोहिते पाटील

- राष्ट्रवादी-

अमोल मिटकरी

शशिकांत शिंदे

-कॉंग्रेस-

राजेश राठोड

Updated : 12 May 2020 12:36 PM GMT
Next Story
Share it
Top