Home > News Update > आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल
X

सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल; झरे येथील शेतकऱ्याची फसवणूक आटपाडी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. विकलेल्या शेत जमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे (रा. झरे) यांनी दिली. एलसीबीसह आटपाडी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी गट नंबर (624 556 व 557/1) मधील अकरा एक शेत जमीन सन 2008 मध्ये दहा लाख पन्नास हजार रुपयाचा तोंडी व्यवहार ठरवला होता. यावेळी पडळकर यांनी एक लाख रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त २१ मार्च २०११ रोजी झाला. त्यावेळी ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे स्टॅम्प ड्युटी फी कमी करण्याचे भासवून खरेदी दस्त करते वेळी फक्त चार लाख 75 हजार रुपये दिले. असे एकूण सदर कुटुंबाला पाच लाख 75 हजार रुपये पडळकर बंधूंनी दिले होते.

प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार दहा लाख पन्नास हजार रुपयाला ठरला होता. पडळकर बंधु त्यांना चार लाख 75 हजार रुपये देणार होते. ते आज अखेर त्यांना दिलेले नाहीत. या उलट त्यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर चालू ठेवला आहे. अखेर या कुटुंबाने पोलिसांच्याकडे धाव घेऊन पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Updated : 5 Jan 2022 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top