आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत केली नितेश राणेंना निलंबित करण्याची मागणी
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  27 Dec 2021 6:50 PM IST
X
X
नितेश राणे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना मांजरीचा आवाज काढला होता. या बद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निषेध व्यक्त केला गेला होता. परंतु रविवारी नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मीच आदित्य ठाकरेंसाठो तो आवाज काढला होता आणि भविष्यात पुन्हा काढेन असं वक्तव्य केलं होतं.
त्यांच्या याच वक्तव्यावरून शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी नितेश राणेंच्या निलंबनाचा ठराव सभागृहात मांडला. आमदार सुनील प्रभूंनी देखील या ठरावाला दुजोरा देत राणेंच्या निलंबनाची मागणी केली. नितेश राणेंचं निलंबन झालंच पाहिजे असं सुहास कांदे यांनी यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
 Updated : 27 Dec 2021 6:50 PM IST
Tags:          Suhas Kande   Nitesh Rane   bjp   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






