Home > News Update > एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट
X

अहमदनगर // एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पाठिंबा दिला आहे.आमदार जगताप यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

नगर शहरातील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संग्राम जगताप यांनी आंदोलनस्थळी जाऊन

कर्मचाऱ्यांना भेटले. या आंदोलनाला समर्थन असल्याचे आमदार जगताप यांनी त्यावेळी सांगितले होते. दरम्यान आमदार जगताप यांनी मुंबईत जाऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली आणि एसटी कामगार संपाच्या बाबत सहानभुतीपूर्वक विचार करण्यात यावा असे निवेदन दिले. त्याचबरोबर अहमदनगर शहरातील तीनही बसस्थानक बीओटी तत्वावर आधुनिक पध्दतीने विकसित करुन कार्यरत करण्याबाबत चर्चा करुन निवेदन दिले. यात शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक चौक बसस्थानकांचा समावेश आहे. दरम्यान याबाबत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री अनिल परब यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Updated : 17 Nov 2021 3:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top