Home > News Update > आमदार अपात्रतेसंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या - सर्वोच्च न्यायालय

आमदार अपात्रतेसंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या - सर्वोच्च न्यायालय

आमदार अपात्रतेसंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घ्या - सर्वोच्च न्यायालय
X

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण सूचना केलीय. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा असून त्यात विलंब करता कामा नये, असं सर्वोच्च न्यायालयानं आपले आदेशात म्हटलंय. शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीनं शिंदे समर्थक आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना ही सूचना केलीय.

Supreme Court directs Maharashtra Speaker to take up disqualification petitions in ShivSena matter within a week. Court says dignity of its judgment should be maintained by the Speaker.

शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आणि त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या विरोधातील अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी घेण्याची स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिलीय. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, या कालावधीत प्रक्रियात्मक निर्देश जारी केले जातील आणि सुनावणीसाठी वेळ निश्चित केला जाईल.

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एका आठवड्यात सुनावणी घेण्यात यावी, असे स्पष्ट निर्देशच सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. मात्र, आपल्या निकालाची प्रतिष्ठा विधानसभा अध्यक्षांनी राखली पाहिजे, अशी अपेक्षाही सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलीय.

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचे पालन विधानसभा अध्यक्षांना करावे लागते. 11 मे (निर्णयाची तारीख)- महिने उलटले आहेत आणि फक्त नोटीस जारी केली आहे", अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Updated : 18 Sep 2023 12:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top