Home > News Update > विकास योजनांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा व्हिडिओ व्हायरल

विकास योजनांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा व्हिडिओ व्हायरल

विकास योजनांवरुन अधिकाऱ्यांची कानउघाडणी, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा व्हिडिओ व्हायरल
X

आपल्या रोखठोख भूमिकुळे नेहेमीच चर्चेत असणारे शिवसेनेचे नेते आणि महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. सोयगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांवर सत्तार प्रचंड भडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. घरकुल योजनेच्या आढावा बैठकीत योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी अधिकाऱ्यांनी दिल्याचा ठपका ठेवत सत्तार यांनी सर्व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. फुकटचा पगार घेता का? या भाषेत अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापले.

अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापल्यानंतर बैठकीला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या, सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत अधिकारी पैशांसाठी योजना रखडवून ठेवतात असा आरोपही सत्तार यांनी केला.


Updated : 15 Feb 2021 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top