Home > News Update > मध्यप्रदेशमधील मंत्रालयाला लागली भीषण आग, महत्वपुर्ण दस्ताऐवज जळून खाक

मध्यप्रदेशमधील मंत्रालयाला लागली भीषण आग, महत्वपुर्ण दस्ताऐवज जळून खाक

भोपाळमधल्या मंत्रालयात भीषण आग लागली आहे. ही आग चौथ्या मजल्यावर लागली आहे. अग्नीशामक यंत्रणेच्या गाड्या घडनास्थळी आग शमवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

मध्यप्रदेशमधील मंत्रालयाला लागली भीषण आग, महत्वपुर्ण दस्ताऐवज जळून खाक
X

News - मध्यप्रदेशमधील मंत्रालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर लागली असून अग्नीशामक यंत्रणेच्या गाड्या घडनास्थळी आग शमवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. आग लागण्याची घटना घडताच गोंधळ उडाला, आग लागताच लोकांनी लवकरात लवकर इमारतीमधून बाहेर धाव घेतली. सदर घटनेची अग्नीशमक विभागाला माहिती देताच घटनास्थळी अग्नीशमन विभागाच्या गाड्या तात्काळ पोहोचल्या. आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही आग कशी लागली या संदर्भात ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही. सांगण्यात येत आहे की, ही आग एवढी तीव्र होती की त्यात सर्व महत्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाला आहे.

Updated : 9 March 2024 11:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top