Home > News Update > भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? ; राज्यमंत्री तनपुरे यांची जोरदार टीका

भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? ; राज्यमंत्री तनपुरे यांची जोरदार टीका

भाजपला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? ; राज्यमंत्री तनपुरे यांची जोरदार टीका
X

अहमदनगर : वीज बिल वसूलीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या भाजप सरकारला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा माझा प्रश्न आहे असं म्हणत राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली. वास्तविक भाजप सरकारच्या काळात जरी वीज बिल वसुली झाली नसली तरी तत्कालीन राज्य सरकारने महावितरण कंपनीला तेवढ्या प्रमाणात अनुदान देणे गरजेचे होते, मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही आणि म्हणूनच आज महावितरणची दुर्दशा झाली आहे अशी टीका राज्यमंत्री तनपुरे यांनी केली. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात कोणत्यातरी योजनेतून महावितरणला केवळ 3 ते 4 कोटी रुपये देण्यात आले मात्र, त्यावेळी थकबाकी जवळपास 30 कोटींच्या घरात होती. त्यामुळे त्यांना आता आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. ते अहमदनगर जिल्ह्यातील गड मांजरसुंभा येथे 8 कोटी 23 लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली काही लोकांना निवडणुकीत पडून देखील अजून समज आली नाही.अजूनही ते राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांवर दबाव आणत आहेत.त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावं की आता मी कार्यकर्त्यांच्या सोबत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील कोणत्याही दबावाला बळी पडू नये. मात्र, अशा लोकांच्या वागण्यावरून त्यांनी राजकारणाची पातळी किती खाली नेली आहे हेच समजत असं राज्यमंत्री तनपुरे म्हणाले.

दरम्यान यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते रेशनकार्ड धारकांना रेशनकार्डचे देखील वाटप करण्यात आहे.

Updated : 11 Dec 2021 3:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top