Home > News Update > मी मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही- रावसाहेब दानवे

मी मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही- रावसाहेब दानवे

मी मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही- रावसाहेब दानवे
X

जालना : 'मी मंत्री झालो परंतु कुणी मला नामदार म्हणायला तयार नाही'.असे म्हणत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत विविध किस्से सांगत चौफेर टोलेबाजी केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे आणि उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय, तसेच व्यापारी-उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, व्यक्तींच्या दिवाळी स्नेहमीलन-कार्यक्रमात दानवे बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही वक्त्यांनी मी साधा-भोळा असल्याचे म्हटले. यामध्ये किती खरे-खोटे हे तुम्हालाच माहीत नाही. मी माणसांच्या टकरा लावणारा माणूस पण लोक मला रेड्यांच्या टकरा लावण्याचे आमंत्रण देतात. यापेक्षा सोपा मंत्री कुठे सापडणार नाही असं दानवे यांनी म्हणताच एकच हसा पिकला

दरम्यान शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा संदर्भ देत दानवे म्हणाले की, सत्तारसेठ बदनापूरच्या फाट्यावरून चालले असताना रस्त्यातील रेल्वेगेट लागले. त्यांचा फोन आला. आधा घंटा हुआ, अब गेट खोलने को लगाना. भोकरदनचा एक काँग्रेस कार्यकर्ता दहा जणांसह द्वितीय श्रेणीची तिकिटे काढून रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात बसले. टीसी आल्यावर त्यांनी त्याला सांगितले की, आम्ही दानवेंच्या गावचे आहोत. आणि एवढ्यावर ते थांबले नाही तर मला फोन लावून त्या टीसीच्या हातात मोबाईल दिला. मग, मी टीसीला सांगितले की, द्वितीय श्रेणी आणि वातानुकूलित डब्याच्या तिकिटातील फरकाची रक्कम त्यांच्याकडून घ्या आणि प्रवास करू द्या. असे अनेक किस्से सांगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उपस्थितीतांना खळखळून हसवले.

Updated : 10 Nov 2021 3:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top