Home > News Update > नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले

नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले

नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना झापले
X

मी परत येईल म्हणत सत्ताधाऱ्यांवर आक्रमकपणे तुटून पडणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी चांगलेच झापले. कोरोना संकट ही वेळ राजकारणाची नसून कोरोना लाईटली घेऊ नका, असं स्पष्ट शब्दात गडकरींनी सुनावलं.

मला काही होत नाही, म्हणणारे लोक जीवानिशी गेले. कोविडचा परिणाम हृदयावर आणि फुफ्फुसावर होत आहे. हे संकट सोपं आहे. मी हात जोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्यांना विनंती करतो.

फडणवीस गडचिरोली चा दौरा केला. शक्यतो गाडीत जाताना किती लोक असतील याची दक्षता घ्या. बहुतेक सगळ्या चर्चा आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर करा. कोरोना लाईटली घेऊ नका. पक्षाची कामं महत्त्वाची आहे, परंतु आता इथून पुढे काम घरून करा. आधी स्वतःची काळजी घ्या. पार्टीचे काम महत्त्वाची असली तर आपला जीव वाचला तर पुढे काम करता येणार आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सगळ्या ठिकाणी राजकारण करू नका. फुटकळ प्रसिद्धीच्या मागे लागू नका, अशा शब्दात गडकरींनी भाजपा कार्यकर्त्यांचे कान टोचले.

Updated : 10 May 2021 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top