Home > News Update > नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून मंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत
X

भामरागड : नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सण साजरा केला.

नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप मंत्री शिंदे यांनी केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे देखील उपस्थित होते.

तसेच, सिरोंचा तालुक्यातील जिल्हा माहिती कार्यालय येथील जंगलात ओरीसा आणि छत्तीसगड येथून आलेल्या जंगली हत्तींना संरक्षण मिळवून देण्यासाठी आढावा बैठक घेऊन चपराळा येथील अभयारण्याची पाहणी मंत्री शिंदे यांनी केली.

गडचिरोली जिल्हयात गेल्या महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबत वन विभाग व प्रशासनाकडून पडताळणी करण्यात आली. हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत व जागा तयार करावयाची असल्यास त्याकरिता कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांनी सादरीकरण केले.

Updated : 30 Oct 2021 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top