Home > News Update > चंद्रकांत पाटलांचाच काय भाजपच्या कोणत्याही नेत्यांचा खिसा एवढा मोठा नाही ; धनंजय मुंडे यांचा टोला

चंद्रकांत पाटलांचाच काय भाजपच्या कोणत्याही नेत्यांचा खिसा एवढा मोठा नाही ; धनंजय मुंडे यांचा टोला

चंद्रकांत पाटलांचाच काय भाजपच्या कोणत्याही नेत्यांचा खिसा एवढा मोठा नाही ;  धनंजय मुंडे यांचा टोला
X

बीड// भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मावळमध्ये पत्रकारांनी नवाब मलिक रोज भाजपावर टीका करतात असा प्रश्न विचारला, याला उत्तर देताना पाटील यांनी नवाब मलिक यांच्या सारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याला आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की, चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे एवढे मोठे नाहीत की ते आम्हाला खिशात ठेवतील, ज्यांनी त्यांनी आपली ठेवून बोलायला पाहिजे असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला.ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सोबतच पुढे बोलताना ते म्हणाले की भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या तोंडी ही भाषा शोधत नाही, ज्याने त्याने स्वतःची ठेवून बोलायला पाहिजे असा खोचक टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. आर्यन खान तसेच समीर वानखेडे यांच्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे भाजपवर दररोज टीका करत आहेत, दररोज नवनवे खुलासे करत आहेत. त्यावरून आता जोरदार राजकीय चिखलफेक पाहायला मिळत आहे

Updated : 31 Oct 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top