Home > News Update > "कूटूंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी शेळीपालन अत्यंत उपयुक्त व्यवसाय" - मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

"कूटूंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी शेळीपालन अत्यंत उपयुक्त व्यवसाय" - मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

कूटूंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी शेळीपालन अत्यंत उपयुक्त व्यवसाय - मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
X

आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी शेळीपालन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. शेळीपालन यामुळे ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबाची गुजराण करण्यासाठी पूरक उद्योग म्हणून फायदा होत असल्याचे वक्तव्य राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी अकोल्यात केले.


अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोट बँक ऑफ कारखेडाच्या डाबकी जहांगीर येथील शाखेचं उद्घाटन आणि स्त्री धन शेळी वाटप योजनेचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बचत गटाच्या महिलांना शेळ्यांचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "शेळी पालनातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळतं, हे सर्वश्रुत आहे. दोन वर्षात राबवलेल्या नावीण्यपूर्ण उपक्रमात 'स्त्री धन शेळी वाटप', हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. माविमच्या मार्फत शेळीचे दूध विक्री व प्रक्रिया यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ." असे आश्वासन देखील त्यांनी दिले.


याशिवाय "याबाबत पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेण्याचे नियोजन आहे. महिला सक्षम झाली तर अत्याचाराचे प्रमाण कमी होते. महिलांकडे उपजत शहाणपण असते. महिला सक्षम होऊन त्यांना आर्थिक साक्षरता यावी.", असा विचार मांडत त्यांनी उपस्थित महिलांना संबोधीत केले.




Updated : 30 Oct 2021 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top