Home > News Update > "पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का?" - मेहबुबा मुफ्ती

"पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का?" - मेहबुबा मुफ्ती

पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का? - मेहबुबा मुफ्ती
X

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे देशभरातील क्रिकेट प्रेमींत निराशेचे वातावरण आहे. त्यातच जम्मू-काश्मीरमधील काही भागात पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी करत केल्याचे वृत्त समोर आले. दरम्यान याबाबत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमातून आले आहे. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणार्‍यांच्या समर्थनार्थ समोर आल्यात आणि लोकांनी विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी यासंदर्भात एक ट्विट करत म्हटले आहे की, "पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींवर एवढा राग का? देश के गद्दार को, गोली मारो… अशा घोषणाही काही लोक देत आहेत. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर किती लोकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला, हे कोणीही विसरू शकत नाही. संतप्त लोकांनी विराट कोहलीप्रमाणे योग्य भावनेने घ्या, ज्याने सर्वप्रथम पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले," असे मुफ्ती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी या ट्विटसोबत विराट कोहलीचा एक फोटोही शेअर केलाय, ज्यामध्ये ती पाकिस्तानी फलंदाज रिझवानशी बोलताना दिसतोय.

Updated : 26 Oct 2021 4:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top