Home > News Update > पुढील ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार?

पुढील ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार?

टोक्यो ऑलिंपिकपाठोपाठ 2024 मध्ये होणारी ऑलिंपिक स्पर्धा फ्रान्समधील पॅरीस येथे पार पडणार आहे. तर त्यानंतर 2028 साली पार पडणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसंबंधी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची 140 वी बैठक मुंबईत पार पडणार आहे. त्यामुळे 2028 ची ऑलिंपिक स्पर्धा भारतात पार होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पुढील ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार?
X

आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक समितीची 139 वी बैठक शनिवारी बिजिंगमध्ये पार पडली. यानंतरच्या बैठकीचे यजमानपद भारताने मिळविले आहे. त्यासाठी २०२३ मध्ये भारत दुसऱ्यांदा ऑल्मिपिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. तर ही बैठक प्रथमच मुंबईत पार पडणार आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत भारताडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १३९ व्या बैठकीत सहभागी झाले होते. तर ऑलिंपिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडु आहे. तसेच बत्रा भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत. तर नीता अंबानी भारतीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य आहेत. याबरोबरच यावेळी भारताचे क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकुरही या बैठकीला उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बैठकीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ट्विट केले आहे.ट्विटरच्या माध्यमातुन नीता अंबानी यांचे आभार मानले आहे. २०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे.२०२३ चे सेशन मुंबई,महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Updated : 19 Feb 2022 7:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top