Home > News Update > मोठा निर्णय: सरकारने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवला

मोठा निर्णय: सरकारने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवला

मोठा निर्णय: सरकारने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबवला
X

देशात रविवारी एकाच दिवसात 2 लाख 61 हजार रुग्ण समोर आले आहेत. तर 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोनाच्या लढाईत मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू असल्याची बाब लक्षात घेता केंद्र सरकारने आता उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा थांबवला आहे.

सरकारने उद्योगांना 9 विशेष प्रकरणात सूट दिली आहे. बाकी सर्वाचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्यात आला आहे.

काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या बैठकीमध्ये 50 हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच पीएम केयर्स फंड मधून 100 नवीन रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

Updated : 18 April 2021 4:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top