Home > News Update > ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये उपाययोजना सुरू- महापौर ढोरे

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये उपाययोजना सुरू- महापौर ढोरे

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये उपाययोजना सुरू- महापौर ढोरे
X

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढल्यानंतर आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबत पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी बैठक घेत,ओमिक्रॉनबाबतच्या खबरदारीची माहिती घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमिक्रॉनच्या उपाययोजना सुरूच आहेत. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांचे ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. सद्यस्थितीला ओमिक्रॉनचे लागण झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या वीर जिजामाता रुग्णालायामध्ये या रुग्णांवर उपाचार सुरु असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इतर 86 परदेशी व्यक्तींचे नमुने घेण्यात आले असून यातील सात जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर पंधरा जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे

ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियम पाळा दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने आपण निर्बंध हटवले होते. कोरोनाच्या नियमनामध्येही काहीशी शिथिलता दिली होती . मात्र , नव्याने आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा नियम कडक करण्यात येत आहेत असं महापौर ढोरे यांनी दिली आहे. ओमिक्रॉनला आटोक्यात आणायचे असेल तर नियमांचं तंतोतंत पालन करायला हवे. शहरवासीय प्रशासनाला यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Updated : 6 Dec 2021 11:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top