महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

सध्या नागपूर येथे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे नागपूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. इतका मोठा बंदोबस्त असताना देखील नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे.

आज रात्री १२.५ वाजता त्यांच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला. जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट येथून परत येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला अशी माहिती आहे.

सिलमपूरमध्ये हिंसक आंदोलन, वाहन जाळली
पालघर जिल्हा परिषदेसाठी  7 जानेवारीला मतदान
डॉ. श्रीराम लागू काळाच्या पड्याआड

दरम्यान संदीप जोशी आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहे. मात्र, राज्याचं पूर्ण मंत्रिमंडळ, सर्व आमदार सध्या नागपूर इथं आहेत. त्यामुळे नागपूरची सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. यापूर्वी देखील नागपुरात असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागपूरची ओळख ‘क्राइम सिटी’ अशी निर्माण झाली आहे.