Home > News Update > Max Maharashtra चा दणका, अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शासकीय प्रमाणपत्राची सक्ती थांबणार

Max Maharashtra चा दणका, अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शासकीय प्रमाणपत्राची सक्ती थांबणार

Max Maharashtra चा दणका, अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शासकीय प्रमाणपत्राची सक्ती थांबणार
X

बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील अंध विद्यार्थ्यांना लेखनिक घेण्याकरिता सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं अपंगत्व प्रमाणपत्र बंधनकारक असते. या विद्यार्थ्यांकडे सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असतानाही ऐन बोर्डाच्या परिक्षेच्या तोंडावर शिक्षण विभागाकडून सिव्हिल हॉस्पिटलमधून कोव्हिड काळात प्रमाणपत्र घेण्याची सक्ती केली जात आहे.

सध्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन प्रमाणपत्र घेणं म्हणजे कोव्हिडला आमंत्रण. शालेय शिक्षण विभागाचा या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार पाहून Max Maharashtra ने 24 April 2021रोजी यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते.


आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांच्या report ची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने तात्काळ हा निर्णय रद्द करून या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक प्रकाशित केले आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या अंध विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते ज्ञानेश्वर आहेरकर, अध्यक्ष हर्षद चक्रधरे व महासचिव जीवन मराठे यांनी Max Maharashtra चे आभार व्यक्त केलं आहे.

Updated : 27 April 2021 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top