Home > News Update > मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार संतोष सोनवणे यांना 'दर्पणकार' पुरस्कार प्रदान...

मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार संतोष सोनवणे यांना 'दर्पणकार' पुरस्कार प्रदान...

मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार संतोष सोनवणे यांना दर्पणकार पुरस्कार प्रदान...
X

मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार संतोष सोनवणे यांना पत्रकारतेचा 'दर्पणकार' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, जळगांव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी रोजीच्या दर्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ९ जानेवारी रोजी घेण्यात आला होता.
दर्पण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार संतोष सोनवणे यांना पत्रकारतेचा 'दर्पणकार' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान देण्यात आला. त्यासोबतचं प्रिंट मीडिया मधील विलास बारी(लोकमत), प्रदीप राजपूत(दिव्यमराठी), देविदास वाणी(सकाळ),राजेंद्र पाटील(पुण्यनगरी) तर इलेक्ट्रॉनिक मीडियामधून चंद्रशेखर नेवे(एबीपी माझा),सचिन गोसावी(दूरदर्शन), छायाचित्रकार आबा मकासरे अशा एकूण आठ जणांना दर्पणकार पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ.संजय ठाकरे, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ.सुधीर भटकर, राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या सह जिल्ह्यातील पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 13 Jan 2024 9:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top