"मॅक्स महाराष्ट्र हे बातमी आणि ब्रेकींगच्याही पलीकडे काम करतेय - आमदार आशिष शेलार
महाराष्ट्रात तंत्रज्ञान मंत्री असणे आवश्यक शेलार यांनी व्यक्त केली खंत
X
मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिक अंक प्रकाशन सोहळ्याला भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान यावेळी त्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या कामाचं कौतुक केलं "मॅक्स महाराष्ट्र हे बातमी आणि ब्रेकींगच्याही पलिकडे कामं करत असते. मॅक्स महाराष्ट्र वैचारिक आणि प्रगल्भ लोकशाही घडवत आहे त्यामुळे मॅक्स महाराष्ट्रची वेगळी ओळख निर्माण झाली असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.
दरम्यान आमदार आशिष शेलार या प्रकाशन सोहळ्यात बोलताना म्हणाले की, मॅक्स महाराष्ट्राची ओळख ही इतर वर्तमानपत्रे किंवा डिजिटल मिडियात काम करणाऱ्या पोर्टल्स किंवा चॅनलसारखी ठोकताळ पध्दतीची नाही. मॅक्स महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या धाटणीचे डिजिटल चॅनल आहे. ज्यांनी समाजातल्या वेगवगेळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आणि तज्ज्ञ लोकांना सोबत घेत वेगळं चिंतन समाजासमोर मांडलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्नांवर देखील आशिष शेलारांनी वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की "देशाचा आर्थिक कणा हा कृषी विभाग आहे. तरीही त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या जोडीने आक्रमक होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात विकासाभिमुक तंत्रज्ञानाचा विचार करणारे खातेही नाही. अशी चिंताही शेलार यांनी व्यक्त केली आहे. तर महाराष्ट्रात तंत्रज्ञान मंत्री असणे आवश्यक असल्याची खंत आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
मॅक्स महाराष्ट्र 'चिंतन वार्षिकांक' प्रकाशनात आशिष शेलार यांनी मॅक्स महाराष्ट्रचे भरभरून कौतुक करत आवर्जून सांगितले की मॅक्स महाराष्ट्र ने माध्यमांमध्ये आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मॅक्स महाराष्ट्रने असेच आपले मुक्त व्यासपीठ कायम ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.