वसई- विरारा विधानसभा मतदारसंघाची लढत

76

वसई मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख, २ हजार १५२ एवढी आहे.हा मतदारसंघ पूर्वीपासून बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९९० पासून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व या मतदारसंघावर आहे. बहुजन विकास आघाडीसाठी हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. २००९ मध्ये वसई-विरार महापालिका स्थापन झाल्यानंतर यातून अनेक गावे वगळण्याचा मुद्दा चर्चेत आला.

सहभाग निधी साठी इथे क्लिक करा

परिसरातील ५२ गावांनी महापालिकेत जाण्यासाठी विरोध केला.वसई बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असला तरी शहरात वारंवार होणारी पूरपरिस्थिती ही सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी बनली आहे. चुळणे, दिवाणमान, माणिकपूर आदी परिसर जलमय होतो. सखल भागात पावसाळ्यात पाणी भरते. वसई जलमय होत असल्याने विरोधकांनी मागील वर्षापासून विविध आंदोलने करून पालिकेला सळो की पळो करून ठेवले होते. त्याच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला यंदाची निवडणुक कठीण जाणार आहे. पंरतु बघणं गरजेच ठरेल येथील जनता कोणाला कौल देते. या मतदारसंघात क्षितीज ठाकुर यांना सरळ टक्कर प्रदिप शर्मा देतील.