Home > News Update > स्वाभिमानी पक्ष, उमेदवार आणि आत्मघाती हमला

स्वाभिमानी पक्ष, उमेदवार आणि आत्मघाती हमला

स्वाभिमानी पक्ष, उमेदवार आणि आत्मघाती हमला
X

निवडणूकीची रणधुमाळी चालू आहे. राजकीय नेत्यांना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपण पाहतोय.आज विधानसभा निवडणूकांच मतदान आहे. सगळीकडे चोख बंदोबस्त असताना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करुन गोळीबार करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेपाच च्या सुमारास देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी पेटवली.

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहिती नुसार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी साडेपाच वाजता गाडीतून जात असताना शेंगुलजरा घाटा जवळ काही अज्ञात लोकांनी त्याची गाडी अडवली अंदाधुंद गोळीबार केला आणि गाडीतून बाहेर काढून मारहाण करत गाडीला आग लावली.

याचं कारण राजू शेट्टींनी सांगितलं "देवेंद्र भुयार हे मतदारसंघात प्रचंड लोकप्रिय झालेत. त्यांच्या मागे संपूर्ण मतदारसंघ उभा आहे. त्यामुळे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या कार्यकर्त्यांना ते पचलं नाही आणि याच दुसरं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघात पैशे वाटपाचं काम सुरु आहे. त्या विरुद्ध देवेंद्र भुयार यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केली परंतु यावर कोणतीही दखल घेतली गेली नाही. याच कारणामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं आणि ही घटना घडली."

असचं महाराष्ट्रात चालत असलं तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ नाही लागणार. या घटनेला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि सरकार आहे जबाबदार असल्याचं मत स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/524545838367846/?t=2

Updated : 21 Oct 2019 9:21 AM GMT
Next Story
Share it
Top