मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट : कंपनी अखेर शेतकऱ्यांच्या बांदावर मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीचा दणका..!
X
देशभरामध्ये नव्या शेतकरी कायद्याविरोधात आगडोंब उसळला असताना नव्या कायद्यांमध्ये तरदूत असलेलं करार शेतीचं विदारक चित्राची दखल कंपनीनं घेतली असून बधित शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन २५ हजार रुपये अदा केले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या टेंभी या गावातील भाऊसाहेब पवार या शेतकऱ्याने करार पद्धतीवर शेती केली होती.मात्र कंपनीने ऐनवेळी फळ घेण्यास नकार दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते.तर त्यांच्या शेतातील माल सडत होता.भाऊसाहेब यांची हीच व्यथा मॅक्स महाराष्ट्राने 12 जानेवारीला महाराष्ट्रासमोर दाखवली होती.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतात पडून असलेला माल संबंधित कंपनीने नेला असून, पवार यांना 25 हजार रुपये मोबदला सुद्धा दिला असल्याचं पवार यांनी सांगितले आहे. मात्र उशिरा फळ नेल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून, बऱ्यापैकी टरबूज शेतात सडून पडले असल्याचे सुद्धा पवार म्हणाले.
पवार यांना जरी 25 हजार मिळाले असले तरीही त्यांच्या भावांच्या पिकाला मात्र किलोला फक्त 1 रुपया भाव दिला आहे. विशेष म्हणजे करारात 7 रुपये किलोचा दर ठरला होता. त्यामुळे आता कायदेशीर पद्धतीने आम्ही लढणार असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे.तर कृषी अधिकारी यांना तक्रार दिली असून, लवकरच पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करणार असल्याचे भाऊसाहेब पवार यांनी सांगितले आहे.
मॅक्स महाराष्ट्र करणार पाठपुरावा
मॅक्सच्या बातमीनंतर कंपनीने 25 हजार देऊन पवार यांचे डोळे पुसण्याच काम केलं आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या पिकाचे पूर्ण पैसे मिळत नाही व त्यांच्या इतर भावांनी कंपनीला दिलेल्या फळाला कराराप्रमाणे मोबदला मिळणार नाही,तोपर्यंत मॅक्स महाराष्ट्र या बातमीचा पाठपुरावठा करत राहणार आहे.






