Max Impact : आमले वाशीयांची जीवघेणी परवड थांबणार! मॅक्समहाराष्ट्र च्या पाठपुराव्याने 26 लाखाचा निधी मंजूर

275

पालघर तालुक्याच्या मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर वसलेल्या 62 घरवस्ती व 322 लोकसंख्या असलेल्या आमले गाव सरकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे विकासापासून दूर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमले गावाला जोडणार पूल नव्हता. परंतू या गावात पाडा समीतीच्या सदस्य व आरोहण च्या प्रयत्नाने गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी येथे पूल बांधण्यात आला.

एका ठिकाणी पूल आहे. परंतु दुसऱ्या ठिकाणी वनविभागाच्या विरोधामुळे पूल बींब उभे करून अर्धवट अवस्थेत काम बाकी आहे. 2014 पर्यंत पावसाळ्यात ग्रामस्थांना गावाबाहेर जानं शक्य नसायचं. अगदी खूप आजारी रूग्ण असेल तर ग्रामस्थ डोली बनवून 5-6 किमी चे अंतर डोंगर चढुन दवाखान्यापर्यंत रूग्णांना पोहोच करायचे. त्या अर्धवट बींब चा वापर करून ग्रामस्थ व आरोहन संस्थेच्या पुढाकाराने 2014-15 मध्ये लोखंडी साकव बांधन्यात आला होता. गेली 4-5 वर्षे त्या साकवमुळे पावसाळ्यात देखील लोकांना रहदारी करता येत होती.

परंतु पावसाळ्यात गारगाई नदीवरून आमले गावाला जोडणारा लोखंडी पूल (साकव) वाहुन गेल्याने पावसाळ्यात तिथे मोटारसायकल घेऊन जाताना दोन्ही बाजूने प्लास्टिक ड्रमचा वापर करावा लागत होता. मुलांना देखील तारेचा आधार घेऊन ये – जा करावी लागत होती.
संपर्क तुटल्यावर लोक कसे जगतात? गेल्या दोन महिन्यांपासुन संपर्क तुटलेल्या आमला गावची कहाणी…

आमले वाशियांची जीवघेणी परवड थांबणार?
https://maxmaharashtra.com/aamala-village-disconnected-from-last-two-months-after-flood-in-palghar-district-2/53003/
आम्ही मतदान का करावं? आमले वाशियांचा जाहिरनामा
https://maxmaharashtra.com/why-should-we-vote-declaration-of-aamle-people/

या मथळ्याखाली विशेष वृत्त मॅक्समहाराष्ट्रा ने प्रसारीत केली होती. यानंतर मॅक्समहाराष्ट्र ने सातत्याने पाठपुरावा केल्यानं पूरग्रस्त निधीतून 26 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी पुन्हा लोखंडी पूल (साकव) उभारला जाणार आहे. हे काम टेंडर प्रक्रियेत असल्याची माहिती मोखाडा सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप बाविस्कर यांनी मॅक्समहाराष्ट्र ला दिली आहे. पूल मंजूर झाल्याच्या माहितीनंतर ग्रामस्थांनी मॅक्समहाराष्ट्र चे आभार मानले आहे.